एकादशी आणि दुप्पट खाशी, असं म्हटलं जातं. तसं आज काही एकादशी नाही पण अंगारक संकष्टी चतुर्थी आहे. उपवास म्हटलं की साबुदाणा आलाच. लहानपणी साबुदाणा खिचडी खाण्यासाठी मी उपवास धरण्याचा हट्ट करायची. जेव्हा जेव्हा आई चा उपवास तेव्हा तेव्हा डब्याला मस्त फराळाचं मिळायचं. क्या दिन थें वो भी.साबुदाणा खिचडी आणि वडे म्हणजे जीव की प्राण अगदी. तसं उपवास करणं सगळ्यांच्या बस ची बात नाहीये. काही जण निर्जळ करतात तर काही या विरुद्ध 🤭. तसं उपवास करूनच भक्ती व्यक्त होते या मतातली मी नाही. उपवास असो की नसो बाप्पा मात्र मनामध्ये सदैव आहेत आणि असणार.😇
तर उपवासाचे खुप सारे पदार्थ आहेत. बटाटा, भगर, साबुदाणे, रताळे, फळं आणि अनेक गोष्टींपासून ते बनवू शकतो. आज मी साबुदाणे वडे बनवले आहेत आणि ते सुद्धा अगदी साध्या सोप्या प्रकारे. तर साहित्य पाहुयात.
1 वाटी भिजवलेले साबुदाणे
1 मोठा उकडलेला बटाटा
3 हिरव्या मिरच्या
1 लहान चमचा जिरे
शेंगदाण्याचा कूट
सैंधव मीठ
कृती :-
सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे. त्याचे लहान टिक्की च्या आकारात थापून घ्यावे. आणि तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे.
दही किंवा चटणी सोबत सर्व्ह करावे.
धन्यवाद.