आपल्या देशात कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात गोड पदार्थाने होते. मग कारण काहीही असो. अश्याच एका गोड पदार्थाबद्दल मी लिहिते आहे. एव्हाना फोटो पाहुन तुम्हाला कळलंच असेल मी कशाबद्दल सांगत आहे. रव्याचा शिरा. रव्याच्या शिऱ्याला आपल्या येथे पूजेत फार महत्व आहे. संपूर्ण देशात रव्याचा शिरा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. सुजी का हलवा या नावाने तो संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
साहित्य :
1 कप रवा
1 कप साखर
सुकमेवा
पाऊण वाटी शुद्ध तुप
1 वाटी दुध किंवा पाणी
वेलची पूड
तुळशीचे पान
कृती
कढई मध्ये तुप गरम झाल्यानंतर त्यात रवा घालून छान परतावे. अगदी थोडासा रव्याचा रंग बदलेपर्यंत. छान खमंग सुगंध येतो. रवा परतत असतानाच दुसऱ्या बाजूला एका भांड्यात दिलेल्या मापात साखर आणि पाणी/दुध उकळून घ्यावे फक्त साखर विरघळेपर्यंत. मग हे पाणी / दुध हळू हळू रव्यामध्ये घालावं. चांगल्याप्रकारे मिसळवून त्यावर ताट झाकण द्यावे. मध्ये मध्ये तपासुन घ्यावं आणि ढवळावं. यात सुकमेव्याचे तुकडे आणि वेलचीपूड घालावी.
एका वाटीत रवा भरून ताटावर उतरवून घ्यावं. त्यावर तुळशीचे पान. ( जर पूजेसाठी बनवत असाल तरच )
आणि आपला मऊ शिरा तैयार आहे.
धन्यवाद
Instagram: cookingglicious