एखाद्या चायनीज रेस्टॉरंट जवळून जाताना बोर्ड न वाचताच कळतं की आपण कोणत्या रेस्टॉरंट जवळ आहोत. चायनीज खाद्यपदार्थ जगभरात त्याचप्रमाणे भारतात मोठ्या प्रमाणावर लोकं आवडीने खातात. जागेनुसार त्या त्या भागात बनवल्या जाणाऱ्या चायनीज पदार्थांची कृती बदलते. आजकल घराघरांत गृहिणी अगदी सहजपणे चायनीज पदार्थ बनवतात. मग ते शाकाहारी असो वा मांसाहारी. मला तर दोन्हीही आणि त्यातील सगळेच प्रकार अतिशय आवडीचे. आज व्हेज फ्राईड राईस बनवला. अतिशय सोप्या आणि बाहेरून बनवलेल्या पेक्षा खुप हेल्थी बनतं.
साहित्य:
शिजलेले बासमती तांदूळ
बारीक कापलेले फरसबी, शिमला मिरची, कोबी, कांदा, लसूण, अद्रक, पातीचा कांदा, रेड आणि ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर, शेझवान सॉस.
कृती :
प्रथम लोखंडी कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल व बारीक कापलेला लसूण घालून 30 सेकंड परतुन घ्यावं.
मग त्यात अद्रक, कांदा, व इतर बारीक चिरलेल्या भाज्या घालून 2-3 मिनिट शिजवून घ्यावं.
त्यानंतर त्यात सगळे सॉस व व्हिनेगर घालून परतुन घ्यावं. मग त्यात शिजवलेला मोकळा बासमती भात घालून त्यावर मीठ आणि काळी मिरपुड घालून हलक्या हाताने ढवळून घ्यावं आणि वरून बारीक कापलेला पातीचा कांदा घालावा.
गरमा गरम सर्व्ह करून शेझवान सॉस सोबत खायला द्यावं.